Ad will apear here
Next
झटपट बनवा
केवळ काही मिनिटांत बनणाऱ्या उपवासाच्या आणि विविध प्रांतातल्या हटके पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रभा प्रभुणे यांच्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात विविध प्रकारची पेये दिली आहेत. नेहमीच्या सरबतांबरोबरच तुळशीच्या बियांच्या सरबतासारखे वेगळे प्रकारही आहेत. लोणची, चटणी, रायते, कोशिंबिरी, सार असा खास विभाग आहेच शिवाय भाज्या, पोळ्या, भाकरी, पुऱ्याही शिकायला मिळतील.

वडे, भजांसारखे चमचमीत पदार्थ, उपवासाचे गोड पदार्थ, चिवडा, चकलीचाही समावेश आहे. याशिवाय कोकणी, गुजराती, राजस्थानी, कर्नाटक, वऱ्हाडी, नागपुरी, सोलापुरी, मराठवाडा, गोवा, पंजाब, बंगाल, आंध्र प्रदेश अशा प्रदेशांतील पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत; तसेच स्टार्टर, व्हेज गोल्ड कॉइनसारखे कॉन्टिनेन्टल पदार्थही आहेत.

प्रकाशक : सुकृत प्रकाशन
पाने : ११८
किंमत : १६० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZPYBI
Similar Posts
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे
बेकरी बेकरी बेकरी उत्पादने हल्ली अनेकदा खाण्यात येतात. बिस्किटे, पाव, खारी, टोस्ट, बटर या शिवाय बेकरी उत्पादनातील सर्वांत खपाचा व लोकप्रिय प्रकार म्हणजे केक. हे सर्व पदार्थ जेथे तयार होतात, त्याला ‘बेकरी’ म्हणतात. बेकरी व्यवसायासाठी काय आवश्यक असते, याची सखोल माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी ‘बेकरी बेकरी’मधून दिली आहे
विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत. विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच ‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे.
मांसाहारी पदार्थ + भात, पुलाव, बिर्याणी, रायती शरीराला उपयुक्त ठरतील असे घटक खाद्यपदार्थांमधूनच मिळाले, तर औषधे घेण्याची गरजच उरणार नाही. मांसाहार हा अशा काही घटकांचा स्त्रोत आहे. मांसाहारी पदार्थाच्या अनेक पाककृती जयश्री कुबेर यांच्या या पुस्तकातून शिकायला मिळतात. अंड्यापासून करीसारखे अन्य पदार्थ तयार करता येतात, तर चिकनपासून अनेक चमचमीत पदार्थ करता येतात, हे पुस्तकातून समजते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language